ताज्या बातम्या
जिल्हा न्यायायलयाबद्दल
कोल्हापूर न्यायालयीन जिल्ह्याला गौरवशाली भूतकाळ लाभला आहे. १८४४ मध्ये राज्यकर्त्यांनी कोल्हापुरात पहिले न्यायालय स्थापन केले. या संस्थानाचे स्वतःचे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय होते. १८६७ मध्ये जिल्हा न्यायालय स्थापन झाले आणि प्रख्यात न्यायशास्त्रज्ञ कै. महादेव गोविंद रानडे हे कोल्हापूरचे पहिले जिल्हा न्यायाधीश झाले. जिल्हा न्यायालयाची जुनी इमारत दीडशे वर्षांहून अधिक जुनी आहे.
"न्यायसंकुल" या नवीन इमारतीचे बांधकाम २००९ मध्ये सुरू झाले आणि दिनांक ०७/०२/२०१६ रोजी उद्घाटन सोहळा पार पडला. न्यायसंकुल मध्ये ३६ कोर्ट हॉल आणि संलग्न कार्यालये सोबतच सुसज्ज लायब्ररी देखील आहे. तळमजला हा वकीलबार, सरकारी वकील कार्यालय, ई-सेंटर/ई-सेंवा केंद्र, हिरकणी कक्ष, मध्यवर्ती कारंजे आणि कॅन्टीनने व्यापलेला आहे.
अधिक वाचाकोणतीही पोस्ट आढळली नाही
कोणतीही पोस्ट आढळली नाही